---Advertisement---

Ladki Bahin Yojana:लाडकी बहिण योजना मोठी खुशखबर!आता लाडक्या बहिणींना मिळणार 3000 रुपये

ladki bahin yojana maharshtra
---Advertisement---

राज्यात महायुती सरकारने 2024 मध्ये Maji Ladki Bahin Yojana Maharashtra ही नवीन योजनेची घोषणा राज्यातील पात्र महिलांना 1500 रुपये देण्याची घोषणा केली होती. परंतु विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर महायुतीने प्रचार करत असताना राज्यातील लाडक्या बहिनीना 2100 रुपये देणार अशी घोषणा केली होती.मात्र राज्यात महायुतीचे सरकार सत्तेत येऊन शंभर ही उलटून गेले आहेत तरी अद्याप देखील बहिनीना 2100 रुपये देण्याची घोषणा झालेली नाही. मात्र आता राज्यातील लाडक्या बहिनी एकविशे रुपयांचा हफ्ता कधी मिळणार याचीच वाट पाहत आहेत.

ladki bahin yojana maharshtra

Ladki Bahin Yojana Maharashtra:

राज्यातील लाडक्या बहिनीना आता सरकार 2100 रुपये देणार की 3000 रुपये आसा प्रश्न पडला आहे, कारण महायुती सरकार मधील सर्वच नेते आम्ही बहीनीना 2100 रुपये देणार अशी वक्तवे करत असतात.परंतु लाड़की बहिन योजनेचे सध्या तरी महिलाना 1500 रुपयांचा हफ्ता दिला जातो.हाच पंधराशे रुपयांचा हफ्ता देताना राज्य सरकारची दमचाक होत आहे. तिजोरी रिकामी असल्याने इतर योजनांवर सुद्धा त्याचा परिणाम होत आहे.नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पमधे Majhi Ladki Bahin Yojana साठी तब्बल 9 हजार कोटी रूपयांच्या निधिला कात्री लावल्याच समोर आले आहे. लाड़की बहिन योजनेसाठी 45 हजार कोटींच्या निधीची आवशक्यता असताना सरकारने केवल 36 हजार कोटींची तरतूद केली आहे.त्यामुले 53 लाख लाडक्या बहिनी आपोआपच वगलल्या जातील अशी चर्चा सुरू झाली आहे,लाड़की बहिन योजनेला निधीची अपुरी तरतूद असल्याने काटेकोर निकष लाउन आतापर्यंत 9 लाख लाडक्या बहिनीना वगलण्यात आले आहे. आणि अशी स्थिति असताना (ladki bahin yojana 2100 ru.installment) लाडक्या बहिनीला वाढीव हफ्ता देन्याच वचन पूर्ण करनार असल्याच बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी म्हंटले आहे.

आता लाडक्या बहिणीला 3 हजार रुपयांचा हफ्ता (Ladki Bahin Yojana 3000 ru.installment):

लाड़की बहिन योजनेचे सध्या तरी महिलांना 1500 रुपयांचा हफ्ता दिला जातो.लाड़की बहिन योजनेबाबत बोलत असताना मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या आता पुढच पाऊल राज्यातील सर्व महिलांना आर्थिक साक्षरता आणणे हा मुख्य उद्दिष्ट समोर ठेवला आहे.महिलाना 2100 रुपये हफ्ता देण्याचा विचार आमच सरकार लवकरच पूर्ण करणार आहे.लाडक्या बहिनीना जस आम्ही दिलेल 1500 रूपयांच वचन पूर्ण केल आहे,तसच 2100 रूपयाच दिलेल वचन आम्ही पूर्ण करणार आहोत.तसेच सरकार मधील भाजपचे आमदार परिणय फुके यानि तर आम्ही लाडक्या बहीनीना 3000 रुपये देणार अशी मोठी घोषणा केली आहे. आमच्या लाडक्या बहिनीचा आमच्यावर पूर्ण विश्वास आहे.तो विश्वास मोडणार नाही आणि सध्या तरी आम्ही 1500 रूपयांचा हफ्ता कायम चालू ठेवनार आहोत. आणि पुढे राज्याची आर्थिक स्तिथि सुधारल्या नंतर आम्ही 2100 तर देउच पन आणखी त्यामधे वाढ करून 3000 रूपयांचा हफ्ता देण्याचा आमचा विचार आहे.

Ladki Bahin Yojana च्या हफ्ता संदर्भात बोलत असताना सत्तेतील आमदार नेते लाडक्या बहीणीना भरमसाठ आश्वासने देत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यानी लाड़की बहिन संदर्भात सावध भूमिका घेतली आहे.विधानसभा अधिवेशन चालू असताना अर्थमंत्री अजित पवार यानी असे म्हंटले कि आम्ही कधी म्हणालों कि वाढीव हफ्ता कधी देणार नाही,2100 रुपयांचा हफ्ता कधी देयचा आम्ही तिन्ही नेते विचार करून आम्ही तो निर्णय लवकरच पूर्ण करू सगली सोंग करता येतात पण पैशाच सोंग करता येत नाही आसही अजित पवार यानी म्हंटले आहे.

लाड़की बहीण योजना मुलेच महायुतीचे सरकार सत्तेत आले आहे. आगामी महापालिकेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर लाड़की बहिन योजनेची मदत होते,पण सत्ताधारी नेते 3000 हजार रूपयांच्या वाढीव हफत्यांच आश्वासने देत आहेत.मात्र सध्या सरकारची तिजोरी मात्र रिकामी असल्याच सरकार मधील मंत्री बोलत आहेत.लाड़की बहिन योजनेअंतर्गत लाड़क्या बहिनीला 3000 रुपये मिलणार आहेत, अस सरकारने वचन दिले आहे.या वचनाची आमंलबजावणी कशी होईल,यावर सध्या चर्चा सुरू आहे.

 लाड़की बहिण योजना पात्रता (Ladki Bahin Yojana Eligibility):

लाड़की बहिन योजनेचा 1500 रुपयांचा हफ्ता मिलवण्यासाठी राज्य सरकारने अनेक काटेकोर पने निकष लावण्यात आले आहेत,लाड़की बहिन योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील निकष आहेत.

  • लाड़की बहिन योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी महिला ही महाराष्ट्राची रहिवाशी असणे आवश्यक आहे.
  • महाराष्ट्रातील विवाहित महिला, विधवा, घटस्पोटित, निराधार महिला.
  • लाभार्थी महिलाचे किमान वय 21 वर्ष पूर्ण आणि जास्तीत जास्त 65 वर्षापर्यन्त असावे.
  • लाड़की बहिन योजनेचा हफत्याचा लाभ घेण्यासाठी महिलेचे स्वतंत्र बँक खाते असणे आवश्यक आहे.
  • लाभार्थी महिलाचे वार्षिक उत्पन्न हे 2.50 लाखापेक्षा जास्त नसावे.

 

 माझी लाड़की बहिण योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे (Ladki Bahin Yojana Document List):

  1. मुख्यमंत्री माझी लाड़की बहिण योजना ऑनलाइन अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे.
  2. लाभार्थी महिलेचे स्वता:चे आधार कार्ड
  3. लाभार्थी महिलेचे महाराष्ट्रातील रहिवाशी प्रमाणपत्र
  4. महाराष्ट्रातील जन्मचा दाखला, मतदान कार्ड, रेशन कार्ड,
  5. सक्षम अधिकारी यांच्या कडील सही शिक्का असलेला उत्पनाचा दाखला व रेशन कार्ड
  6. बँक पासबूकच्या पाहिल्या पानाची कॉफी
  7. पासपोर्ट साईज चे 2 फोटो
  8. रेशन कार्ड
  9. लाड़की बहिन योजना ना हरकत प्रमाणपत्र

 माझी लाड़की बहिण योजनेसाठी अर्ज कसा करायचा? (Ladki Bahin Yojana Online Apply):

  1. मुख्यमंत्री माझी लाड़की बहिन योजनेसाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला या योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाईन अर्ज करता येतो आणि तुम्ही तुमच्या मोबाइल वर सुद्धा व आपले सरकार सेवा केंद्र येथे पण आपण ऑनलाइन अर्ज भरु शकता.
  2. पात्र असलेली महिला जर अशिक्षित असेल किंवा ऑनलाइन अर्ज करता येत नसेल तर त्या लाभार्थी महिलाना अर्ज भरण्यासाठी गावातील अंगनवाड़ी केंद्र, सेतु सुविधा केंद्र, ग्रामपंचायत कार्यलय, तलाठी कार्यालय, वार्ड, बालविकास अधिकारी कार्यालय, येथे या लाड़की बहिन योजनेचा अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली असते.
  3. लाड़की बहिन योजना ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी लाभार्थी स्वतः महिला ज्या ठिकाणी अर्ज भरत आहे त्यासाठी ती महिला उपस्थित असणे आवश्यक आहे.व त्या लाभार्थी महिलेसोबत सर्व आवश्यक कागदपत्रे असणे देखील गरजेचे आहे.
  4. लाड़की बहीण योजनेचा अर्ज करण्यासाठी सर्व अर्ज प्रक्रिया ही निशुल्क आहे
  5. माझी लाड़की बहिन योजना ऑनलाइन अर्ज खालील वेबसाईटवर करू शकता.

 माझी लाड़की बहिण योजनेसाठी कोण अपात्र असणार? (Ladki Bahin Yojana Ineligible):

  • लाड़की बहिन योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी महिलेचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेकक्षा जास्त असेल तर
  • लाभार्थी महिला जर कोणत्याही प्रकारचा टॅक्स भरत असतील तर
  • ज्या लाभार्थी महिला कुटुंबात घरी 4 चाकी गाड़ी असेल तर ( ट्रैक्टर वगलून )
  • ज्या लाभार्थी महिलेच्या कुटुंबात 5 एकर पेक्षा जास्त जमीन असेल तर
  • लाभार्थी महिलेच्या कुटुंबातिल इतर सदस्य जर कोणताही शासकीय लाभ घेत असतील किंवा नोकरी करत असतील तर
  • लाभार्थी महिला कुटुंबातील सदस्य आजी माजी आमदार खासदार असेल तर

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment