Majhi Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना सरकारकडून माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत दरमहा १५०० रुपये गिफ्ट दिले जाते परंतु अनेक कारणांमुळे लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा हफ्ता अजूनही खात्यावर जमा झाला नाही.कोणत्या कारणांमुळे हफ्ता मिळाला नसेल हेच आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत.
Majhi Ladki Bahin Yojana:
राज्यात मुलींना व गरीब महिलांना स्वावलंबी, आत्मनिर्भर बनविण्यासाठी तसेच महिला व त्यांच्या वर अवलंबून असलेल्या लहान मुलांच्या आरोग्य आणि पोशन स्थितीत सुधारणा व्हावी यासाठी राज्य सरकारने महाराष्ट्रात २०२४ या वर्षी राज्य सरकारकडून मध्य प्रदेश च्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने देखील “माझी लाडकी बहीण योजना” सुरू करण्याची घोषणा महायुती सरकारचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २०२४ या सालात केली आहे.
Ladki Bahin Yojana Scheme Installment चे आतापर्यंत दरमहा १५०० रुपये असे १६ हफ्ते लाडक्या बहिणींच्या बॅंक खात्यावर जमा करण्यात आले आहेत. आताच राज्य सरकारकडून ऑगस्ट सप्टेंबर चा हफ्ता वितरीत करण्यासाठी ३४४ कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली होती.दोन्ही महिन्याचा हफ्ता एकत्र ३००० रुपये जमा होणार अशी चर्चा होती परंतु १२ सप्टेंबर २०२५ पासून लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचाच फक्त हफ्ता खात्यावर जमा झाला आहे.राज्यातील लाखो लाडक्या बहिणींना हा हफ्ता अजूनही खात्यावर जमा झाला नाही याला अनेक तांत्रिक अडचणी असू शकतात.
Majhi Ladki Bahin Yojana: हफ्ता न मिळण्याची मुख्य कारणे
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करत असताना राज्य सरकारकडून राज्यातील सरसकट बहीणींसाठी ही सुरू केली, परंतु काही हफ्ते लाडक्या बहिणींना दिल्यानंतर निधीच्या अभावी राज्य सरकारकडून अर्जाची पडताळणी सुरू करण्यात आली. त्यामध्ये अनेक लाडक्या बहिणींनी चूकीची माहिती दिल्यामुळे पडताळणी करत असताना या अशा लाखो महिलांचे अनेक अर्ज बाद करण्यात आले.
• लाडकी बहीण योजना सुरू केली तेव्हा अनेक लाडक्या बहिणींनी अर्जामध्ये चुकीची माहिती भरली आहे.
• ही योजना फक्त राज्यातील २१ ते ६५ वयोगटातील महिलांसाठी आहे.जर तुम्ही तुमचे वय चुकीचे दिले असेल तर तुमचा अर्ज बाद झाला आहे.
• लाडकी बहीण योजना अर्ज भरताना तुमच्या कुटुंबात २.५ लाखांपेक्षा कमी उत्पन्न दाखवले असेल आणि तुमचे वार्षिक उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त असेल तरी देखील तुमचा अर्ज बाद झाला असेल.
• लाडकी बहीण योजना चे आतापर्यंत मिळालेले हफ्ते ज्या बॅंकेत जमा होतात त्या Bank Account ला तुमचे आधार कार्ड लिंक आहे का ते पहावे. लिंक नसेल तर लगेच लिंक करुन केवायसी ladki Bahin Yojana e-kyc करावी.
• तुमच्या खात्यात पैसे जमा झाले की नाही ते चेक करण्यासाठी तुम्ही तुमच्या बॅंकेत जाऊन शिल्लक balance चेक करु शकता. काही तांत्रिक कारणांमुळे तुम्हाला मेसेज आला नसेल.
• जवळच्या एटीएम सेंटर वर जाऊन देखील खात्याची शिल्लक तपासणी करु शकता.
लाडकी बहीण योजना कोणते अर्ज बाद केले ?
- संजय गांधी निराधार योजना लाभार्थी – २ लाख ३० हजार अर्ज
- ६५ वर्षा पेक्षा जास्त वयाची महिला – १ लाख १० हजार अर्ज
- कुटूंबातील सदस्यांच्या नावे चारचाकी वाहने असलेल्या व नमो शेतकरी योजना व पीएम किसान योजना लाभार्थी – १ लाख ६० हजार अर्ज
राज्यातील असे एकूण ५ लाखांपेक्षा जास्त अर्ज पडताळणी करताना सरकारकडून बाद करण्यात आले. ज्या पात्र महिलांच्या बॅंक खात्यावर पैसे जमा झाले नाहीत त्यांनी चिंता करु नये असे राज्य सरकारकडून आवाहन करण्यात आले आहे.कारण राज्य सरकारकडून या योजनेच्या निधीचे वितरण टप्या टप्प्याने सुरू आहे.आणि लवकरच सर्व पात्र महिलांच्या बॅंक खात्यावर १५०० रुपयांचा हप्ता जमा करण्यात येईल.
काही वेळा अनेक बॅंकेचे काही तांत्रिक कारणांमुळे सर्व्हर डाउन असते.त्यामुळे त्या खात्यावर केलेले व्यवहार काही वेळानंतर अपडेट केले जातात.अनेक वेळा तुमचे आधार लिंक ची देखील अडचण असू शकते त्यामुळे जर आधार कार्ड लिंक नसेल तर तुमचा हफ्ता मिळण्यास विलंब होऊ शकतो.
लाडक्या बहिणींना या सविस्तर माहिती पाहिल्यामुळे हफ्ता न जमा होण्याची कारणे समजली असतील तर या वरील कारणांपैकी आपण आपली कोणती समस्या आहे ते तपासून पाहू शकता.आणि लाडकी बहीण योजना ऑगस्ट महिन्याचा हफ्ता जमा होणार आहे.
Majhi Ladki Bahin Yojana: सप्टेंबर हफ्ता कधी मिळणार ?
लाडकी बहीण योजना चा ऑगस्ट महिन्याचा निधी सरकारकडून वितरित केला आहे. आणि सप्टेंबर चा हफ्ता सरकार लवकरच लाडक्या बहिनीना बँक खात्यावर जमा करणार आहे. त्यामुळे आप आपले बँक खाते तपासून तयार ठेवावे.