Ladki Bahin Yojana E-KYC कशी करावी? राज्यातील महायुती सरकारने अतिशय कमी कालावधीत लोकप्रिय ठरलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मध्ये पात्र असलेल्या लाडक्या बहिणींना आता राज्य सरकारकडून ई-केवायसी (Ladki Bahin Yojana E-KYC) करणे बंधनकारक करण्यात आले आहे.आता ही e-kyc करण्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही,आता तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाईल मधून ही पद्धत वापरून तुम्ही कोणत्या ही अडचणी शिवाय तुमची केवायसी पूर्ण करु शकता,हीच सविस्तर माहिती आपण आता खालील अतिशय सोप्या पद्धतीने पाहणार आहोत.
Ladki Bahin Yojana E-KYC kashi karavi? –
राज्यात महायुती सरकारने २०२४-२५ मध्ये गरिब परिस्थिती असलेल्या लाडक्या बहिणींच्या लहान मुलांचे आरोग्य सुधारण्यासाठी व राज्यातील एकही लाडकी बहीण कोणावर अवलंबून न राहता तिने तिचे कुटुंबाचे आर्थिक नियोजन व्यवस्थित पार पाडण्यासाठी सरकारने “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” सुरू करुन पात्र असलेल्या लाडक्या बहिणींना दरमहा पंधराशे रुपये इतके मानधन देण्यात येत आहे. आतापर्यंत या योजनेमध्ये लाडक्या बहिणींच्या बॅंक खात्यावर अनेक हफ्ते जमा करण्यात आले आहेत.
परंतु मागिल काळात लाडकी बहीण योजना ladki Bahin Yojana मध्ये अनेक लाडक्या बहिणी पात्र नसताना देखील या योजनेमध्ये लाभ घेत असल्याचे सरकारच्या लक्षात आल्यानंतर राज्य सरकारकडून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात लाडकी बहीण योजना अर्ज पडताळणी करण्याची प्रोसेस सुरू करुन पात्र नसलेल्या लाडक्या बहिणींचे अर्ज बाद करण्यात आले आहेत.मात्र आता राज्यातील लाडकी बहीण योजना मधील पात्र असलेल्या प्रत्येक लाडक्या बहिणींना E-KYC करणे बंधनकारक करण्यात आले आहे,अशी माहिती बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले आहे.
राज्य सरकारकडून लाडकी बहीण योजना ची केवायसी लाडक्या बहिणींना कुठेही जाण्याची गरज नसावी, घरबसल्या स्वतः च्या मोबाईल मधून, आणि कोणालाही एक रुपया ही देण्याची गरज पडू नये या करिता सरकारकडून एक नवीन वेब पोर्टल तयार करण्यात आले आहे.आता तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाईल मधून लाडकी बहीण योजनची E-KYC सोप्या पद्धतीने कशी करायची ते पाहणार आहोत.
Majhi Ladki Bahin Yojana New Update: लाडकी बहीण योजना हफ्ता मिळाला नसेल तर हे 1 काम करा अन्यथा..
Ladki Bahin Yojana E-KYC Process – लाडकी बहीण योजना ई-केवायसी कशी करायची?
लाडकी बहीण योजना केवायसी करण्यासाठी तुम्ही खालील पद्धतीचा वापर करून कोणत्याही अडचणी शिवाय तुमची केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकता.
- सर्वप्रथम आपल्याला केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी खाली दिलेल्या Ladki Bahin Yojana E-KYC या बटणावर क्लिक करावे लागणार आहे.
- क्लिक केल्यावर नविन पेज वर तुम्हाला redirect केले जाईल.लाडकी बहीण योजना नविन वेब पोर्टल ओपन होईल.
- नवीन वेब साईट ओपन झाल्यानंतर मुखपृष्ठावर असलेल्या E-KYC या बटणावर क्लिक करुन पुढे जायचे आहे.
- क्लिक केल्यावर ई-केवायसी चा नविन ladki Bahin Yojana E-KYC Form ओपन होईल.
- फॉर्म ओपन झाल्यानंतर पात्र असलेल्या लाभार्थी महिलेचा आधार क्रमांक टाईप करावा.
- आधार क्रमांक टाईप केल्यानंतर पडताळणी सांकेताक (Captcha Code) जसा आहे तसा इंटर करुन आधार प्रमाणीकरणा साठी संमती देऊन send otp या बटणावर वर क्लिक करावे.
- त्यानंतर लाभार्थी महिलेच्या आधार लिंक मोबाईल नंबर वर एक ओटीपी पाठवला जाईल, आलेला otp नमूद करुन पुढील submit बटणावर क्लिक करावे.
- पुढे प्रणाली तुम्ही या अगोदर तुमची केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे की नाही हे तपासण्यासाठी थोडा वेळ घेऊ शकते.
- जर तुमचा आधार क्रमांक लाडकी बहीण योजना पात्र यादीत असेल पुढची process चालू राहील.
पुढच्या टप्प्यात लाभार्थी महिलेच्या पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक इंटर करुन तसेच पडताळणी संकेतांक (Captcha Code) नमूद करावा.पुढील प्रक्रिया करण्यासाठी संमती देऊन Send ओटिपी बटणावर वर क्लिक करावे. आधार लिंक असलेल्या OTP संबंधित मोबाईलवर प्राप्त झाल्यावर तो इंटर करुन Submit बटणावर क्लिक करावे.
त्यानंतर लाभार्थी महिलेला आपला जात प्रवर्ग निवडावा लागणार आहे आणि खालील बाबी प्रमाणित (Declaration) कराव्या लागतील. म्हणजेच पुढील प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी माझी संमती आहे.असे स्पष्ट करावे लागेल.
1. माझ्या कुटुंबातील एकही सदस्य नियमित/कायम कर्मचारी म्हणून शासकीय विभाग/उपक्रम/मंडळ/भारत सरकार किंवा राज्य शासनाच्या स्थानिक संस्थेत कार्यरत नाहीत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाहीत.
2. माझ्या कुटुंबातील केवळ १ विवाहित आणि १ अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेत आहोत. कुटूंबातील दुसरा सदस्य या योजनेमध्ये सहभागी नाही.
• वरील बाबींची नोंद करून चेक बॉक्सवर क्लिक करावे व Submit बटणावर क्लिक करावे.
• शेवटी ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, “Success – तुमची ladki Bahin Yojana E-KYC Successfull असे पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे” असा संदेश तुम्हाला दिसेल.
लाडकी बहीण योजना ची e-KYC करण्यासाठी दोन महिन्याचा कालावधी राज्य सरकारकडून देण्यात आला आहे. पुढच्या दोन महिन्यांत सर्व पात्र असलेल्या लाडक्या बहिणींनी आपली केवायसी प्रक्रिया पूर्ण करुन घ्यावी.असे सरकारने लाडक्या बहिणींना आवाहन केले आहे.
माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थी भगिनींनी पुढील 2 महिन्यांच्या आत आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी.वर सांगितलेली ही प्रक्रिया अतिशय सहज, सोपी व सुलभ असून, योजने मध्ये पारदर्शकता कायम ठेवण्यासाठी, पात्र लाभार्थ्यांना नियमित लाभ मिळण्यासाठी सर्वांनी ही प्रक्रिया पूर्ण करावी. ही प्रक्रिया आपल्याला भविष्यातील इतर शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठीही उपयुक्त ठरणार आहे, असे त्यांनी सांगितले आहे.