---Advertisement---

Farmers Relief Package – शेतकऱ्यांसाठी 31,628 कोटीचे पॅकेज जाहीर पण,कोणाला किती मदत मिळणार? पहा सविस्तर

Farmers Relief Package
---Advertisement---

राज्यात जून ते सप्टेंबऱ् महिन्यात अतिवृष्टी पाऊस महापूर झाल्याने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे पीक नुकसान झाले आहे. जगाचा पोशिंदा शेतकरी राजा हातचे सर्व पीक पावसाने उद्ध्वस्त केल्याने पुरेसा हतबल झाला आहे,राज्यातील 29 जिल्ह्यात सर्वात जास्त शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.अशातच तोंडावर दिवाळी सन समोर दिसत आहे. पण राज्य सरकारने नुसाणग्रस्त भागाची पाहणी करत असताना राज्याचे मुख्यमंत्री Devendra Fadnvis यांनी बळिराजाला आश्वासन दिले होते की,शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार हेच आश्वासन सरकारने काल शेतकऱ्यांसाठी 31,628 कोटी रुपयांचे मोठे (Farmers Relief Package) पॅकेज जाहीर करून मोठा दिलासा दिला आहे. परंतु राज्यात अनेक भागात मोठे नुकसान मग कोणत्या शेतकऱ्यांना किती मदत मिळणार? रब्बी पेरणीसाठी किती रक्कम मिळणार? हा शेतकऱ्यांना प्रश्न पडला आहे. याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.

Farmers Relief Package

Farmers Relief Package –

राज्य सरकारकडून पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी भरीव मदतीचे महायुती सरकारने 31,628 कोटीचे आतापर्यंतचे सर्वात मोठे पॅकेज जाहीर केले आहे.परंतू या जाहीर केलेल्या पॅकेजमधून कोणत्या शेतकऱ्यांना काय मिळणार आणि किती मदत मिळणार असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडला आहे. सरकारचा घेतलेला निर्णय काय आहे, साधारणपणे या जाहीर केलेल्या पॅकेजमध्ये महत्वाची गोष्ट ही आहे की नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी किती मदत मिळणार? कोरडवाहू शेतकऱ्यांना किती मदत,बागायती क्षेत्राला किती मदत मदत मिळणार याबद्दल सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे आहे.

कोरडवाहू शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी किती मदत?

राज्यात २९ जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे. कोरडवाहू क्षेत्राचे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना NDRF च्या निकषांनुसार सरकारने आकडे वारी जाहीर केली आहे. NDRF च्या निकषांनुसार कोरडवाहू क्षेत्रासाठी 8,500 रुपये इतकी मदत दिली जाते.पण राज्य सरकारकडून या मदतीमध्ये 10 हजार रुपये जास्तीचे देण्याचा निर्णय घेतला आहे.एकुण कोरडवाहू क्षेत्रासाठी सरकारकडून 6,500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.कोरडवाहू नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना NDRF निकषांनुसार 8,500 रुपये + आणि त्यात राज्य सरकारकडून जास्तीचे टाकलेले 10 हजार प्रति हेक्टर म्हणजेच कोरडवाहू क्षेत्रासाठी शेतकऱ्यांना एकूण 18,500 रुपये प्रति हेक्टरी एवढी मदत दिली जाणार आहे.

• बागायती शेती क्षेत्रासाठी 32,500 रुपये प्रति हेक्टरी एवढी मदत शेतकऱ्यांना मिळणार आहे.

• हंगामी बागायती क्षेत्रासाठी 27,000 हजार रुपये प्रति हेक्टरी एवढी मदत शेतकऱ्यांना मिळणार आहे.

• रब्बी हंगामात पेरणी करण्यासाठी अतिरिक्त 10 हजार रुपये जास्तीचे पैसे सरकारकडून दिले जाणार आहेत.

• पिकविमा भरलेल्या शेतकऱ्यांना 17,000 हजार रुपये प्रति हेक्टरी पिक विमा वाटप केला जाणार आहे.

जमिनी खरडून गेलेल्या शेतकऱ्यांना किती मदत?

राज्यात सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी व महापुराने 60 हजार हेक्टर एवढी जमीन खरडून गेलेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी पॅकेज (Farmers Relief Package) मध्ये निधीची तरतूद करण्यात आली आहे. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या आहेत.अनेक शेतकऱ्यांची तर जमिनच राहिलेली नाही अनेक ओढे नद्यांनी प्रवाह बदल्याने जमिनी खरडून उद्धवस्त झाल्या आहेत. जमिनी खरडून गेलेल्या शेतकऱ्यांना भरीव मदतीची गरज पण सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या पॅकेज मध्ये किती मिळणार मदत? याची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे आहे.

• राज्यातील खरडून गेलेल्या 60 हेक्टर जमीनीसाठी शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 3.50 लाख (साडेतीन लाख रुपये) मदतीची तरतूद (Farmers Relief Package) मध्ये केली आहे.यामधील मदत पुढीलप्रमाणे दिली जाईल.

• खरडून गेलेल्या जमिनीची मदत कॅश स्वरुपात (hand cash) 47,000 हजार रुपये दिले जाणार आहेत.

• खरडून गेलेल्या जमिनीची उर्वरित रक्कम 3,00,000 लाख रुपये ‘मनरेगा’ च्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत दिली जाणार आहे. यामध्ये खरडून गेलेल्या जमिनी वरती मोफत शासनाकडून गाळ उपसा करुन दिला जाणार आहे.तसेच शेतकऱ्यांच्या जमिनीवर गाळ टाकण्यासाठी लागणारी वाहने, (उदा.जेसीबी, ट्रॅक्टर,) यासाठी होणारा खर्चाची तरतूद याच निधीमध्ये केली आहे.असे एकूण खरडून गेलेल्या जमिनीची मदत शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 3.50 लाख रुपये मिळणार आहे.

दुधाळ जनावरांना किती मदत? 

राज्यात आलेल्या पूर संकटामध्ये अनेक शेतकऱ्यांची दुधाळ जनावरे दगावली आहेत.काही जनावरे तर पुराच्या प्रवाहात वाहून गेली आहेत,ज्या शेतकऱ्यांची जनावरे दगावली/ वाहुन गेले आहेत त्यांना किती मदत मिळणार ते पुढीलप्रमाणे आहे.

• या अगोदर NDRF च्या निकषांनुसार शेतकऱ्यांची जास्तीत जास्त 3 जनावरे दगावली किंवा पुरामध्ये वाहून गेली तर 3 पर्यंतच मर्यादा होती.

• राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या पॅकेज मध्ये ती मर्यादा बाजूला काढून शेतकऱ्यांची जेवढी जनावरे दगावली किंवा पुरामध्ये वाहून गेली आहेत त्या दुधाळ जनावरांना 37,500 रुपये मदत दिली जाणार आहे.

• तसेच शेतकऱ्यांच्या शेतात राबणाऱ्या जनावरांना 32,000 हजार रुपये मदत मिळणार आहे.

ST Mahamandal Bharti 2025|एसटी महामंडळात 17,450 जागांची मोठी भरती असा करा अर्ज|st mahamandal bharti 2025 new update

गाळाने भरलेल्या विहीरींना किती मदत? 

राज्यात महापूर आल्यामुळे नदिकाठच्या अनेक शेतकऱ्यांच्या विहीरी मध्ये वाहून आलेला गाळ भरला आहे. किंवा अनेक विहिरी पाण्याच्या जोरात प्रवाहामुळे कोसळल्या तर काहींची पडजड होऊन नुकसान झाले आहे. अशा विहिरीच्या नुकसान भरपाईसाठी प्रति विहीर 30,000 हजार रुपये मदत जाहीर केली आहे.

कुक्कुटपालन व्यवसायासाठी किती मदत? 

जोरदार अतिवृष्टीने कुक्कुटपालन व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा या नुकसानीची झळ लागली आहे.यामध्ये काही कोंबड्या मृत्यूमुखी पडल्या,तर काही कोंबड्या पाण्यात वाहून सुद्धा गेल्या आहेत. तसेच कुक्कुटपालन व्यवसायाच्या बांधकामाची काही ठिकाणी पडजड झाली आहे यासाठी सुद्धा सरकार कडून प्रति कोंबडी 100 रुपये मदत शेतकऱ्यांना मिळणार आहे.

घराचे नुकसान मदत किती? 

राज्यात अनेक जिल्ह्यातील महापूराचे पाणी अनेक शेतकऱ्यांच्या व नागरिकांच्या घरात गेले होते, त्यामुळे अनेक घरांची पडझड झाली तर काही ठिकाणी घरे पूर्णतः उद्धवस्त झाली आहेत.ज्यांच्या घराचे नुकसान झाले आहे त्यांच्यासाठी सरकारकडून प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत नविन घरे बांधून देण्याचा निर्णय घेतला आहे.

• पण डोंगरी भागातील नुकसान झालेल्या घरांना अधिकचे 10,000 हजार रुपये दिले जाणार आहेत.

• नदिकाठच्या गावातील घरे, दुकाने, गोठे, वाहून गेल्याने नुकसान झाले आहे त्यांच्यासाठी 50,000 हजार रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी मोठी घोषणा?

राज्यात अतिवृष्टी झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांकडून व विरोधकांकडून ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली जात होती.परंतू ओला दुष्काळ जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना फीस माफी किंवा अतिरिक्त मदत दिली जाते तशीच या भागातील विद्यार्थ्यांचे परिक्षा शुल्क पूर्णपणे माफ करण्याची मोठी घोषणा (Farmers Relief Package) मधून केली आहे.

पूरग्रस्त शेतकऱ्यांना पिकविमा किती मिळणार? 

पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कि या संपूर्ण अतिवृष्टीने व महापूर काळामध्ये शेतकऱ्यांच्या पिक विमा pikvima yojana 2025 संदर्भात राज्य सरकार काय तरतूद करणार आहे? कारण आता अगोदरचे ट्रिगर काढले आणि त्यानंतर प्रति उंबरठा पद्धतीच्या माध्यमातून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पिकविमा योजनेचा लाभ देणार असे आश्वासन सरकारने शेतकऱ्यांना दिले होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी Farmers Relief Package ची घोषणा करताना स्पष्ट केले कि ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे पूर्णपणे नुकसान झाले आहे त्यांच्यासाठी उंबरठा पद्धतीचा निकष हा बाजूला ठेवून त्यांना १००% पिकविमा रक्कम 17,000 हजार रुपये प्रति हेक्टरी दिली जाणार.या शेतकऱ्यांना पिकांची नुकसान भरपाई ही पिकविम्याच्या माध्यमातून मदत मिळणार आहे.

पिकाचे नुकसान झालेल्या उर्वरित शेतकऱ्यांना उंबरठा पद्धतीने मदत देण्यात येईल यासंदर्भात केंद्रीय कृषिमंत्री यांच्याशी चर्चा झाली आहे.पिकविमा कंपन्यावर दबाव टाकून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत कशी देता येईल हा आमचा प्रयत्न आहे असे मुख्यमंत्री म्हणाले आहेत.

Ladki Bahin Yojana E-KYC कशी करावी? लाडक्‍या बहिणींसाठी Step by Step ही पद्धत वापरा सोप्या भाषेत!

अशा प्रकारे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नुकसानग्रस्त शेतकर्यांसाठी जाहीर केलेल्या (Farmers Relief Package on Cm Devendra Fadnvis) पॅकेजमधून या निधीचे सर्वांना नुकसान भरपाई व मदत राज्य सरकारकडून दिवाळीच्या अगोदर जमा करु असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment