---Advertisement---

Government New Scheme: लाडक्या बहिणींना सरकारचे आणखी एक गिफ्ट! पाळणाघर योजनेतून प्रतिमहा ५५००₹ मिळणार

Palnaghar Goverment New Scheme
---Advertisement---

मिशन शक्ती अंतर्गत पाळणाघर योजनेची राज्यात अंमलबजावणी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे Government New Scheme या नविन योजनेची  लाडक्या बहिणींसाठी सरकारने आणखी एक मोठे गिफ्ट दिले आहे. Palnaghar Goverment New Scheme या पाळणाघर योजनेतून राज्यातील महिलाना प्रतिमहा ५५००₹ ते 3000 रुपये पर्यन्त मानधन दिले जाणार आहे. आता या पाळणाघर योजना नेमकी काय आहे? कोणत्या महिलाना लाभ मिळणार? स्वरूप कसे असेल? मानधन या बद्दल सविस्तर माहिती पाहूया.

Government New Scheme –

राज्यातील लाखो नोकरदार महिलांच्या जीवनाला राज्य सरकारकडून नवी ताकद मिळणार आहे.राज्यात शहरी भागात अनेक महिला नोकरदार वर्गात आहेत. व या नोकरदार महिलांच्या लहान मुलांसाठी सुरक्षित आणि पोषणयुक्त वातावरण निर्माण व्हावे याकरिता सरकारने पाळणाघर योजना महाराष्ट्रात सुरु होत आहे. महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही योजना राबविली जाणार असून, नोकरदार मातांच्या मुलांच्या संगोपनाची मोठी जबाबदारी आता शासन उचलणार आहे. कामगार व नोकरदार महिलांना मिळणार दिलासा महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात ३४५ ठिकाणी ही पाळणाघरे सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

पहिल्या टप्प्यात राज्यात 345 पाळणा केंद्रे सुरू होणार असून, यासाठी मिशन शक्ती अंतर्गत केंद्र आणि राज्य शासन निधी उपलब्ध करून देणार अशी घोषणा बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी काल माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे.

केंद्र शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनां नुसार मिशन शक्ती मधील “सामर्थ्य” या कार्यक्रमांतर्गत राज्यात “पाळणाघर” ही योजना सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

नोकरी करणाऱ्या महिलांना आपल्या मुलांची काळजी घेता यावी यासाठी ६ महिने ते ६ वर्ष वयोगटातील मुलांसाठी अंगणवाडीत “पाळणाघर” योजना राबवण्यात येणार आहे.

Realme p4 pro 5G: रिअलमी ने केला दमदार Smartphone लॉन्च! तुमच्या बेस्ट बजेटमध्ये,असे आहेत Features

Palnaghar Goverment New Scheme Facilities:

(पाळणा योजनेअंतर्गत मुलांना मिळणाऱ्या सुविधा)

– डे केअर सुविधा

– पूर्व शालेय शिक्षण

– पूर्वपोषण आहार

– वाढीचे निरीक्षण

– आरोग्य तपासणी

– लसीकरण

– दिवसातून तीन वेळा आहार (सकाळचा नाश्ता, दुपारचे गरम शिजवलेले जेवण आणि संध्याकाळचा नाश्ता )

पाळणाघर महिन्यातील २६ दिवस, दररोज ७.५ तास सुरू असणार आहे.

पाळणाघराच्या व्यवस्थापनासाठी एक पाळणा सेविका व एक पाळणा मदतनीस नेमण्यात येईल.

Palnaghar Goverment New Scheme GR

 

Palnaghar Government New Scheme GR -

Palnaghar Goverment New Scheme Objectives:

( पाळणाघर योजना मुख्य उद्दिष्टे )

केंद्र शासनाच्या मिशन शक्ती अंतर्गत सामर्थ्य या उपक्रमामध्ये महिलांना नोकरीदरम्यान मुलांची काळजी घेता यावी, यासाठी ६ महिने ते ६ वर्षे वयोगटातील मुलांसाठी अंगणवाडीत “पाळणा” ही योजना सुरू करण्यात आली आहे. यामुळे कामगार व नोकरदार महिलांना मोठा दिलासा मिळणार असून मुलांच्या संगोपनासाठी सुरक्षित व दर्जेदार सुविधा उपलब्ध होणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.

महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात ३४५ ठिकाणी ही पाळणाघरे सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. पाळणाघरांमध्ये डे-केअर सुविधा, पूर्व शालेय शिक्षण, पूरक पोषण आहार, वाढीचे निरीक्षण, आरोग्य तपासणी, लसीकरण आदी सुविधा दिल्या जाणार आहेत. तसेच मुलांना दिवसातून तीन वेळा म्हणजेच सकाळचा नाश्ता, दुपारचे गरम शिजवलेले जेवण आणि संध्याकाळचा नाश्ता देण्यात येईल.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी नवा शासन निर्णय, विधानसभा क्षेत्रात महिलांच्या अडचणी मार्गी लावणार

Palnaghar Goverment New Scheme Honorarium:

( पाळणाघर योजना मानधन व भत्ता )

पाळणा घर महिन्यात 26 दिवस, दररोज 7.5 तास सुरु राहील, यामध्ये जास्तीत जास्त 25 मुले असतील. याठिकाणी एक पाळणा सेविका व एक पाळणा मदतनीस नेमण्यात येईल. वीज, पिण्याचे पाणी, बालस्नेही शौचालय यांसारख्या सुविधा उपलब्ध असणार आहेत.
या कार्यक्रमाअंतर्गत अंगणवाडी सेविका यांना ₹1500 प्रतिमाह भत्ता देण्यात येणार आहे. अंगणवाडी मदतनीस यांना ₹750 प्रतिमाह, पाळणा सेविका मानधन यांना ₹5500 प्रतिमाह, तर पाळणा मदतनीस यांना ₹3000 प्रतिमाह भत्ता देण्यात येणार आहे.

केंद्र सरकारने सद्यस्थितीत दिलेल्या मान्यतेनुसार राज्यात ३४५ पाळणा सुरू करण्यात येत आहेत. यापुढे केंद्र सरकार मान्यता दिली त्याप्रमाणे संख्येत वाढ करण्यासही राज्य शासनाने मान्यता दिली आहे. तसेच, या योजनेची तातडीने अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक आदेश देण्याच्या सूचना महिला व बालविकास विभागाच्या आयुक्तांना देण्यात आल्या आहेत.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment