---Advertisement---

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी नवा शासन निर्णय, विधानसभा क्षेत्रात महिलांच्या अडचणी मार्गी लावणार

Ladki Bahin Yojana New GR
---Advertisement---

लाडकी बहीण योजना Ladki Bahin Yojana New GR सरकारकडून सर्वात मोठा निर्णय घेण्यात आला आहे.आता राज्यातील बहिणीसाठी मोठी खुषखबर समोर आली आहे.

Ladki Bahin Yojana :

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारने विधानसभा निवडणुकी अगोदर मोठी घोषणा केली होती.राज्यातील महिला सक्षम व आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व महायुती सरकारने राज्यातील बहिणीसाठी दर महिन्याला १५०० रुपये देण्याची घोषणा केली होती.आतापर्यंत या योजनेचे अनेक हफ्ते महिलांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत.

Ladki Bhahin Yojana Application Verification:

माझी लाडकी बहीण योजना ही सुरू झाली तेव्हा राज्य सरकारने राज्यातील सरसकट बहीणींसाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आणि निवडणूक झाल्यानंतर लाडकी बहीण योजना मुळे इतर अनेक योजना निधीअभावी रखडल्या जात होत्या.त्यामुळे राज्य सरकारने या योजनेमध्ये नविन बदल करण्याचे ठरवले आणि नविन ladki Bahin new gr नुसार योजनेमध्ये पात्र नसलेल्या लाडक्या बहिणीच्या अर्जांची पडताळणी करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सुरुवात करण्यात आली.

पुढील काळात या पडताळणी मध्ये अनेक महिलांचे अर्ज निकषा बाहेर पडले. त्यामुळे अनेक लाडक्या बहिणींना या योजनेच्या १५०० रुपयांच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे. आता ladki Bahin Yojana scheme च्या अनेक तक्रारी येत आहेत त्यामुळे राज्य सरकारने या योजनेमध्ये नविन बदल करण्याचे ठरवले आहे.

Realme p4 pro 5G: रिअलमी ने केला दमदार Smartphone लॉन्च! तुमच्या बेस्ट बजेटमध्ये,असे आहेत Features

Ladki Bahin Yojana New GR:

Maji Ladki Bahin Yojana New GR, नुसार सरकारने राज्यातील बहिणीसाठी मोठी खुषखबर दिली आहे.राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत लाडकी बहीण योजना मध्ये येणार्या तांत्रीक अडचणींचा लाडक्या बहिणींना सामोरे जावे लागत होते.परंतू सरकारने यावर आता नवीन gr निर्गमीत करुन तोडगा काढला आहे.

माझी लाडकी बहीण योजना मध्ये येणार्या तांत्रीक अडचणी आता विधानसभा क्षेत्रामध्येच दूर करण्यात येणार आहेत. नव्या निर्णयानुसार योजनेसाठी जिल्हाधिकारी यांनी विधानसभा निहाय आता समिती गठित करण्यात येणार आहे.आणि या समितीमध्ये शासकिय सदस्यांची नेमणूक करण्याचे शासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच ३ अशासकीय सदस्यांचा देखील समावेश केला जाणार आहे.

लाडकी बहीण योजना आता विधानसभा क्षेत्रामध्येच अधिक प्रभावी व अधिक उपाययोजना तसेच लाडक्या बहिणींना येणार्या तांत्रीक अडचणी सुद्धा या समिती मार्फत सोडविल्या जाणार आहेत.तसेच राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदार संघात ही योजना अधिक गतिमान व सुलभपणे राबविण्यात येणार आहे.त्यामुळे आता लाडक्या बहिणींना कोणतीही तांत्रिक अडचणी येणार नाहीत.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment