महाराष्ट्रा राज्यात एसटी महामंडळात सर्वात मोठी चालक आणि वाहक,सहायक पदासाठी मोठी भरती (ST Mahamandal Bharti 2025) तब्बल 17450 पदे कंत्राटी पद्धतीने भरली जाणार आहेत. जर तुम्ही सुद्धा या नोकरीची वाट पाहत असाल तर आता तुमच्यासाठी राज्य सरकार कडून ही मोठी आनंदाची बातमी दिली आहे. कालच माध्यमाशी बोलत असताना राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही एसटी महामंडळात भरती होणार अशी मोठी घोषणा केली आहे. राज्यात एसटी महामंडलात 17450 जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. आज या लेखामध्ये आपण अर्ज प्रक्रिया कधी पासून सुरू होणार आहे? तुमचे शिक्षण किती असायला पाहिजे? पगार/वेतन किती मिळणार? कोणत्या पदासाठी किती जागा भरल्या जाणार आहेत? अर्ज कोठे करायचा? याबद्दलची सविस्तर माहिती आज आपण पाहणार आहोत.
ST Mahamandal Bharti 2025:
राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी सर्वात मोठी खुशखबर आली आहे. महाराष्ट राज्य परिवहन महामंडळामध्ये सर्वात मोठी 17450 जागांची भरती होणार आहे, ही भरती चालक(ड्रायवर),वाहक(कंडकटर),सहायक,लिपिक अशी 8 ते 10 वेगवेगळी पदे कंत्राटी पद्धतीने भरून घेतली जाणार आहेत. यासाठी 2 ऑक्टोंबर पासून निविदा प्रक्रिया सुरू होणार आहे. या सर्व पदामधून एकूण 17450 जागांची भरती ची जाहिरात म्हणजेच पदे भरून घेतली जाणार आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ लवकरच (MSRTC) 8000 नवीन बसेस ची खरेदी केली जाणार आहे. या सर्व नवीन गाड्यांना मनुष्यबळ पुरवण्यासाठी परिवहन महामंडळाने सर्व जागा कंत्राटी पद्धतीने चालक आणि वाहक कर्मचारी भरती करून घेण्याचा निर्णय राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी घेतला आहे. ही भरती प्रक्रिया लवकरच सुरू केली जाणार आहे,राज्यातील इच्छुक उमेदवारांसाठी ही एक मोठी संधि आली आहे.
ST Mahamandal Bharti 2025: (भरती चे मुख्य उद्दिष्टे)
महाराष्ट्र सरकार जर वर्षी अनेक नाव बस गाड्या खरेदी करत असते,परंतु सरकारने 2025-26 या वर्षात 8000 नविन बसेस खरेदी केल्या आहेत. शासनाच्या नव्या बस सेवा वाढीच्या नवीन योजना आणि एसटी च्या नवीन बस सेवा विस्तारामुळे आवश्यक मनुष्यबळाची मोट्या प्रमाणात गरज भासत आहे. खरेदी केलेल्या नवीन बसेस सेवा सुरळीत चालू राहण्यासाठी चालक आणि वाहक तसेच सहायक पदांची मोठ्या प्रमाणावर गरज आहे. त्यामुळे परिवहन महामंडळ कंत्राटी पद्धतीने 3 वर्षाच्या कालावधीसाठी 17450 पदे भरत आहे.
ST Mahamandal Bharti 2025: (वेतन किती मिळणार?)
एसटी महामंडळाने दिलेल्या माहिती नुसार msrtc bharti 2025 प्रक्रियेत निवड होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुरुवाती पासूनच किमान 30 ते 35 हजार रुपये इतके वेतन दिले जाणार आहे. म्हणजेच ही वेतन तुम्हाला 30 हजार रुपयांपेक्षा जास्तच असणार आहे.या आकर्षक वेतनाच्या संधी मुळे तरुण युवकांमद्धे या नोकरीबद्दल अधिक उत्सुकता निर्माण झाली आहे.
Ladki Bahin Yojana E-KYC कशी करावी? लाडक्या बहिणींसाठी Step by Step ही पद्धत वापरा सोप्या भाषेत!
ST Mahamandal Bharti 2025: (वयोमर्यादा?)
एसटी महामंडळ भरती प्रक्रिया मध्ये सहभाग घेण्यासाठी किमान वय हे 18 वर्ष असणे गरजेचे आहे. आणि कमाल वय शासन नियमा नुसार असणार आहे.
MSRTC Bharti 2025 (शैक्षणिक पात्रता?)
एसटी महामंडळ भरती प्रक्रिया मध्ये चालक पदासाठी सहभाग घेण्यासाठी तुमच्याकडे वैध driving license असणे आवश्यक आहे.
MSRTC Bharti 2025 (निवड प्रक्रिया?)
- एसटी महामंडळ भरती प्रक्रिया ही कंत्राटी पद्धतीने भरती होणार आहे.
- या भरतीची निविदा प्रक्रियेनंतर पात्र उमेदवारांची निवड होईल.
MSRTC Bharti 2025 (अर्ज प्रक्रिया?)
एसटी महामंडळ भरती 2025 ची अर्ज प्रक्रिया ही 2 ऑक्टोंबर पासून सुरू होणार आहे. आपण खाली दिलेल्या लिंकच्या माध्यमातून अर्ज करू शकता.
- ST Mahamandal Bharti 2025 जाहिरात PDF
- ST Mahamandal Bharti 2025 Form Submit
Majhi Ladki Bahin Yojana New Update: लाडकी बहीण योजना हफ्ता मिळाला नसेल तर हे 1 काम करा अन्यथा..